विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथचं व्रत करतात. या दिवशी पत्नी निर्जळी उपवास करते. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर पती आणि चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा करवा चौथचा उपवास करतात.

वाचा : बिग बी यंदा वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाहीत!

अभिनेता अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर हिच्या घरी होणारे ‘करवा चौथ’चे सेलिब्रेशन दरवर्षी खास असते. यंदाही रविवारी संध्याकाळी श्रीदेवी, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, नीलम कोठारी, संजय कपूरची पत्नी महीप संधू, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे यांनी अनिल कपूर व सुनीता कपूरच्या घरी ‘करवा चौथ’ची पूजा केली. वरूण धवनची आई करूणा धवन आणि वहिनी जान्हवी धवन यासुद्धा यावेळी दिसल्या.

https://www.instagram.com/p/BZ_z7B5A-_q/

शिल्पाने या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. एका पोस्टमध्ये शिल्पा हातात चाळणी धरून पती राजला पाहत उपवास सोडताना दिसते. त्याचसोबत एका व्हिडिओमध्ये सर्व महिला करवा चौथच्या शुभेच्छा देताना दिसतात.

वाचा : टेलिव्हिजनवरील कलाकारांना कुत्र्यासारखं राबवून घेतात- सैफ

शिल्पाने एक मजेशीर व्हिडिओही शेअर केलाय. यात रात्री १० पर्यंत आकाशात चंद्र दिसण्याची वाट पाहिल्यानंतर भूकेने व्याकूळ झालेली शिल्पा केक खाण्याचा आनंद घेताना दिसते. नेहमीच आपल्या स्टाइल स्टेटमेण्ट्सने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या या अभिनेत्रीने यावेळी लाल रंगाची साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र आणि मोत्यांचा लांबलचक हार तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होता.