कोरिओग्राफरपासून दिग्दर्शक झालेल्या रेमो डिसूझाचे एबीसीडी (Any Body Can Dance) आणि ‘एबीसीडी २’ (Any Body Can Dance 2) हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजले. डान्सवर आधारित या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेण्ड तयार केला. आता याच चित्रपटाचा तिसरा भाग सध्या जोरदार चर्चेत आहे. रेमोच्या या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि कतरिना कैफ ही जोडी दिसणार आहे.

‘टी सीरिज’ निर्मित हा देशातील सर्वांत मोठा डान्सफिल्म असणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये प्रभूदेवा, धर्मेश येलांडे, पुनीत पाठक, राघव जुयल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. दुसऱ्या भागात वरुण आणि श्रद्धा कपूरची जोडी पाहायला मिळाली होती. वरुणच्या उत्तम नृत्यकौशल्यामुळेच त्याला तिसऱ्या भागासाठीही निश्चित करण्यात आले आहे. आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच वरुण- कतरिनाची जोडी एकत्र येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही जोडी कितपत आवडते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

https://www.instagram.com/p/BgfeVKQg3AD/

वाचा : ..अन् बिग बींना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरुण सध्या त्याच्या आगामी ‘सुईधागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर रेमो सलमान खानच्या ‘रेस ३’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. कतरिना कैफसुद्धा ‘झिरो’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.