बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आली आणि पहिल्या दिवसापासून ती इन्स्टाग्रामवर सक्रीयही झाली. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला. यात ती व्हेल माश्यासोबत स्विमिंग करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कतरिना पाण्याच्या आत कॅमेऱ्यासमोर हात हलवताना व्हेल माश्यासोबत दिसत आहे. याआधीही कतरिनाने इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे सध्या लाखो फॉलोवर्स आहेत.

प्रभासच्या ‘साहो’मध्ये अनुष्का दिसेल हॉट लूकमध्ये

कतरिनाचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. कतरिनासोबत या सिनेमात रणबीर कपूरही आहे. आतापर्यंत जग्गा जासूसच्या प्रदर्शनाच्या अनेक तारखा बदलण्यात आल्या. पण अखेरीस अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. ‘गलती से मिस्टेक’ हे या सिनेमातलं दुसरं गाणं शुक्रवारी प्रदर्शित केले जाणार आहे.

https://www.instagram.com/p/BVEgPRCAGBO/

अजूनतरी कतरिना आणि रणबीरने सिनेमाचे प्रमोशन करायला सुरूवात केलेली नाही. ‘राजनिती’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या दोन सिनेमात एकत्र काम केले होते. याशिवाय कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमाही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कतरिना अॅक्शन सीन करताना दिसणार आहे, ज्यासाठी ती खास ट्रेनिंगही घेत आहे. या सिनेमातून कतरिना आणि सलमानची जोडी पाच वर्षांनंतर एकत्र पडद्यावर दिसणार आहे.

‘राबता’ सिनेमाला न्यायालयाकडून मोठा दिलासा, ‘मगधिरा’ची कॉपी नाही

सलमान आणि कतरिनाची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना फार पसंत आहे. त्यामुळे या दोघांना परत एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ही प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमानंतर कतरिना आणि सलमान, अतुल अग्निहोत्रीच्या सिनेमातही एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.