कलाविश्वात अभिनेत्री आणि अभिनेत्यांना त्यांच्या सौंदर्यासह शरीरयष्टीवरही लक्ष देणे फार गरजेचे असते. अभिनेत्रींसाठी सुडौल आणि कमनीय बांधा असणे महत्त्वाचे असते. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, करिना कपूर खान, सोनम कपूर, परिणीती चोप्रा, ईशा गुप्ता, बिपाशा बासू या अभिनेत्री त्यांच्या शरीरयष्टीवर विशेष लक्ष देत असल्याचे त्यांच्याकडे पाहून कळते. त्यांच्या जीम वर्कआउटचे व्हिडिओही सोशल मीडियावर पाहावयास मिळतात. या अभिनेत्रींप्रमाणेच जीमला प्राधान्य देणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ आणि आलिया भट्ट.
वाचा : ‘ते’ फोटो लीक करण्यामागे कंगनाचाच हात?
कतरिना आणि आलिया जीममध्ये घाम घाळत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. स्वतः कतरिनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून, यात कतरिना ही आलियाची जीम ट्रेनर झाल्याचे दिसते. सेलिब्रिटींना जीम ट्रेनिंग देण्यासाठी यास्मिन कराचीवाला प्रसिद्ध आहे. तिच्याकडेच या दोन्ही अभिनेत्री जीम ट्रेनिंगसाठी जातात. पण, एक दिवस यास्मिन जीममध्ये न आल्यामुळे कतरिनानेच आलियाला ट्रेन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे या व्हिडिओत पाहावयास मिळते.
वाचा : ‘घुमर’ गाण्यात दीपिकाने घातलेल्या लेहंग्याची किंमत माहितीये का?
व्हिडिओमध्ये आलिया ‘स्कॉट्स’ मारताना दिसते. तसेच, आलियासमोर ३०० स्कॉट्स मारण्याचे आव्हान असल्याचे कतरिनाने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.