प्रत्येक कलाकाराने कितीही मोठी भूमिका साकारली तरी त्यांच्या मनात एकतरी ‘ड्रीम रोल’ असतोच. बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेल्या अभिनेत्री कतरिना कैफलाही एक भूमिका साकरण्याची इच्छा आहे. लहान असताना हिंदी चित्रपटांचे इतके काही वेड नसलेल्या कतरिनाला जुने क्लासिक चित्रपट मात्र भावतात, असे तिने म्हटले आहे. जुन्या काळातील एका चित्रपटातील अजरामर अशी भूमिका तिला साकारायची आहे.
वाचा : शत्रुघ्न सिन्हा-त्रिशाला दत्तची ग्रेट भेट
मला जुने हिंदी चित्रपट बघायला आवडतात. काही क्लासिक चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत मोडतात, असे कतरिना म्हणाली. सध्या जुन्या चित्रपटांचा रिमेक काढण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. अशात तुला कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल, असा प्रश्न कतरिनाला करण्यात आला असता तिने लगेच ‘मुघल-ए-आजम’ असे उत्तर दिले. ती म्हणाली की, मुघल-ए-आजमचा रिमेक आल्यास मला त्यात काम करायला नक्की आवडेल.
बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांमध्ये ‘मुघल-ए-आजम’चे नाव आघाडीवर येते. ‘मुघल-ए-आजम’ प्रदर्शित होताच या चित्रपटाने त्यावेळचे सर्व बॉक्स ऑफिस विक्रम मोडले होते. सलीम – अनारकलीची प्रेमकथा असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. याविषयी कतरिना म्हणाली की, हा एक सुंदर चित्रपट आहे. त्यातलं संपूर्ण जग मला भावलं. त्यामुळे मला अनारकलीची भूमिका साकारायला आवडेल.
वाचा : ‘नवाजुद्दीन आमचा साधाभोळा’
कतरिनाने तिला अनारकलीची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे तर व्यक्त केले. पण, तिची ही इच्छा भविष्यात पूर्ण होणार की नाही हे येणारा काळच सांगेल.