छोट्य़ा पडद्यावरी लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच करत नाही तर या शोमुळे प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते. सोबतच या शोमुळे आजवर अनेकांचं नशीब उजळलं आहे. या शोमध्ये सामील होण्याचं भाग्य लाभलेल्या अनेक नशीबवान स्पर्धकांचं स्वप्न पूर्ण करण्यास या शोने हातभार लावलाय. शिवाय देशातील महानायक बिग बी अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत असल्यामुळे या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकालाच बिग बींसोबत काही क्षण घालवण्याचं भाग्य लाभलं आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकासोबतच दिलखुलास गप्पा मारताना दिसतात. स्पर्धकाचा ताण कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हसत खेळत हलकं फुलकं वातावरण कसं निर्माण करावं हे या शोमध्ये बिग बींकडे पाहून कळतं. नुकत्यात प्रसारित झालेल्या खास एपिसोडमध्येही एक प्रश्न वाचताना बिग बी अमिताभ बच्चन यांची देखील चांगलीच बोबडी वळली. बिग बी यांच्यासमोर आशिष नावाचा स्पर्धक होता. या स्पर्धकासाठी स्क्रीनवर प्रश्न आला तो म्हणजे, “म्यूकोर्मायकोसिस हा रोग कोणत्या सामान्य नावाने ओळखला जातो?” हा प्रश्न विचारताना बिग बी ‘म्यूकोर्मायकोसिस’ हा शब्द वाचताना अडखळले. हा शब्द योग्य उच्चारण्यासाठी बिग बींनी आणखी काही प्रयत्न केले. मात्र अखेर मोठ्या दिलखुलास अंदाजात ते म्हणाले, “हे तर बोलता बोलताच माणूस आजारी होईल” अखेर बिग बींनी ‘म्यूकोर्मायकोसिस’ शब्द योग्यरित्या उच्चारत प्रश्न पूर्ण केला.
हे देखील वाचा: “करण जोहर सलमान खानपेक्षाही…”; सोफिया हयातची ‘बिग बॉस’शोवर टीका
View this post on Instagram
बिग बींनी विचारलेल्या या प्रश्नावर ‘ब्लॅक फंगस’ हे योग्य उत्तर देत स्पर्धक आशिषने रक्कम जिंकली. मात्र यावेळी शोमध्ये मजेशीर वातावरण पाहायला मिळालं.
बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जातात. बिग बींच्या आवाडजातील डायलॉग असो किंवा त्यांनी वाचलेल्या कविता. सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील या व्हिडीओंना चाहत्यांची कायम पसंती मिळताना दिसते.