छोट्या पडद्यावरील अनेकांना धनलाभ मिळवून देणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये येण्यासाठी अनेकजण मोठी मेहनत घेतात. शोमध्ये सहभाग घेण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असले तरी प्रत्येकाचं स्वप्न साकार होतंचं असं नाही. या शोच्या १३व्या पर्वात देखील देशभरातील बुद्धीवान आपलं नीशब आजमवण्यासाठी सज्ज आहेत.
‘कौन बेनेगा करोडपती’ शोमध्ये अनेकांप्रमाणे मोठी रक्कम जिंकण्याचं स्वप्न बाळगून आलेले ज्ञान राज यांची थोडी निराशा झाली. एका चुकिच्या उत्तरामुळे त्यांनी केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकले. असं असलं तरी बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत रांची इथल्या ज्ञान राज यांनी त्यांचा शोमधील आणि बिग बींच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. यावेळी बिग बी त्यांच्याशी कसे वागले हे सांगतानाता ज्ञान राज यांनी सेटवर बिग बींच्या पाया पडण्याची परवानगी नसल्याचा खुलासा केला.
मुलखतीत ते म्हणाले, “बिग बी संपूर्ण देशाचे रोल मॉडल आहेत. माझं बालपणीही त्यांना पाहण्यात गेलं. या शोमध्ये येण्यासाठी मी खूपच उत्सुक होतो. बिग बींना पहिल्यांदा पाहिल्यावर खूपच आनंद झाला. मी कमी बोलणारा आहे. २३ तारखेला शोचा पहिला एपिसोड येणार होता. तेव्हाच माझा वाढदिवस असल्याने मला चांगलं परफॉर्म करायचं होतं. जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्या खूप गप्पा मारल्या. मला थोडं कम्फर्टेबल केलं. ” असं ज्ञान राज म्हणाले.
View this post on Instagram
या मुलाखतीत ज्ञानराज यांनी सेटवर काही नियम कडक असल्याचा खुलासा केला. बिग बींच्या हातांना किंवा पायांना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती असं ज्ञानराज यांनी सांगितलं. कोव्हिडच्या नियमांनुसार सेटवर ही बंधन घालण्यात आली असल्याचं ते म्हणाले. मात्र असं असलं तरी बिग बींनी खूप गप्पा मारल्याचा आनंद ज्ञान राज यांनी व्यक्त केला.