सर्वसामान्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि त्यांना कोट्यवधींची स्वप्न दाखवणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या ९ व्या पर्वाने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली. घरबसल्या पैसे कमवण्याची संधी देणारा नवा पर्याय यंदाच्या पर्वात सुरु केल्यामुळे कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये बराच फायदा झाला. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला केबीसी ९ टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

वाचा : युवराज सिंगच्या पत्नीबद्दल पसरतेय ‘ही’ अफवा

कार्यक्रमामध्ये प्रत्येक आठवड्यात येणारे स्पर्धक आणि पाहुणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहेत. गरजूंना मदत करता यावी या उद्देशाने काही सेलिब्रिटी केबीसीमध्ये येतात. नुकतेच या कार्यक्रमामध्ये ‘हॉट सीट’वर बसण्यासाठी आणि बिग बींच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घरचाच पाहुणा आला होता. अभिनेता अभिषेक बच्चन याने आपल्या वडिलांच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.

वाचा : ‘किडनी दिल्याबद्दल मी तिची ऋणी राहीन’; ‘या’ गायिकेने मानले मैत्रिणीचे आभार

‘गुंज फाउंडेशन’चे संस्थापक अंशू गुप्ता यांच्यासह अभिषेकने एका समाज उपयोगी कार्यकरता देणगी जमा करण्यासाठी उपस्थिती लावली. नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या पीडितांना कपडे आणि पुनर्वसनासाठी मदत करण्याकरिता अंशू काम करतात. कार्यक्रमादरम्यान, अंशू यांनी अभिषेकला त्याने कान टोचण्यामागचे गुपित विचारले. आराध्या लहान असताना तिचे कान टोचण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा तिला काही त्रास होणार नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी अभिषेकने आधी स्वतःचा कान टोचून घेतला. आराध्याला त्रास होणार नाही याची खातरजमा झाल्यानंतरच त्याने तिचे कान टोचण्यास परवानगी दिल्याचे अभिषेकने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा किस्सा सांगत असताना बिग बी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावूक स्वभाव असलेल्या ‘ज्युनियर बी’चे आपल्या लाडक्या लेकीवर असलेले प्रेम यातून दिसून येते.