‘कौन बनेगा करोडपती’च्या (केबीसी) १३ व्या सीझनसह अमिताभ बच्चन प्रेक्षकांमध्ये परतले आहेत. या आठवड्यात केबीसीचा सेलिब्रिटी एपिसोड शुक्रवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. यावेळी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग शोमध्ये पाहुणे म्हणून येतील. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमी होस्टच्या सीटवर बसणारे अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत, तर गांगुली त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करणार आहे.
सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केबीसीच्या या सेलिब्रिटी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे, सुरुवातीला गांगुली प्रेक्षकांना होस्ट म्हणून ओळख करून देतो आणि मग अमिताभ बच्चन यांना वीरेंद्र सेहवाग ही तुमची एकमेव लाईफलाइन आहे, असे सांगतो. यानंतर बिग बी सेहवागकडे पाहतात आणि म्हणतात की वीरू जी मला सांगतील. मात्र, गांगुली बच्चन यांना सेहवागवर कधीही विश्वास ठेऊ नये, असे सांगतो. हे ऐकून सगळे हसतात. मात्र, अमिताभ चिंताग्रस्त होतात.
यानंतर, ते शोचा होस्ट गांगुलीला विनंती करता, की दादा, आमच्यावर दया करा. यानंतर गांगुली त्यांना एकामागून एक प्रश्न विचारू लागतो. यावर अमिताभ म्हणतात, ”आता कळते की जो इथे बसतो त्याची काय स्थिती असते.” त्यांचे उत्तर ऐकून सेहवाग आणि गांगुलीही हसतात.
View this post on Instagram
हेही वाचा – ‘धोनीप्रेमी’ सिद्धार्थ शुक्ला; रिटायरमेटंवेळी केलेली पोस्ट पुन्हा चर्चेत!
सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत पार पडलेला एपिसोड धमाकेदार असणार आहे. ‘शानदार शुक्रवार’ या खास भागात दादा आणि वीरू यांची जोडी बिग बींसोबत धमाल करणार हे या प्रोमोवरून लक्षात येत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता हा खास एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.