बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे लाखो चाहते आहेत. सध्या अमिताभ हे छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १३’ चे सुत्रसंचालन करत आहेत. बऱ्याच वेळा त्यांचे चाहते ‘केबीसी’च्या हॉट सीटवर असल्याचे आपण पाहतो. त्यात ‘केबीसी १३’ चा गुरुवारचा एपिसोड हा तर खूप मजेदार होता. या एपिसोडमध्ये अमिताभ यांच्या एका चाहतीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चाहतीने बिग बींना चक्क फ्लाइंग किस दिली आणि त्यानंतर अमिताभ देखील लाजले, तर तिथे उपस्थित असलेले दुसरे लोक हसू लागले. त्यावर अमिताभ यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांना हसू अनावर झाले.

शोमध्ये स्पर्धक कल्पना यांनी एका प्रश्नाचे अचुक उत्तर दिल्यानंतर त्या हॉट सीटवर आल्या. त्यानंतर कल्पना यांनी अमिताभ यांना एक फ्लाइंग किस दिली. त्यानंतर अमिताभ म्हणाले, ‘मॅडम बघा, माझ्या वैवाहिक जीवनात एक मोठी समस्या आली आहे. तुम्ही एवढ्या फ्लाइंगकिस दिल्या, काय सांगू.’ यानंतर, प्रेक्षक देखील हसू लागतात.

आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या गणेश चतुर्थी स्पेशन एपिसोडमध्ये दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी हजेरी लावली होती. त्याचा प्रोमा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रोमो पाहिल्या पासून प्रेक्षक या आगामी एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताजी जेठालाल नव्हे तर नऊ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ अभिनेत्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये?

या एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण अमिताभ यांच्याकडे रणवीरची तक्रार करताना दिसते. दीपिका म्हणाली की, ‘रणवीरने तिला वचन दिले होते की तो तिच्यासाठी नाश्ता बनवेल पण त्याने ते कधीही केले नाही, त्यानंतर अमिताभ स्वतः रणवीरला फोन करतात आणि त्याला याविषयी बोलतात.’ तर ते ऐकूण रणवीर बोलतो ‘बेबी…मी तुला मांडीवर बसून आमलेट खायला देईन.’

 

Story img Loader