माहिताचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे पाहिले जाते. सध्या ‘कौन बनेगा करोडपतीचे १३’ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करतात. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. ते शो मध्ये सहभागी झाल्यानंतर अतिशय आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. पण घरी गेल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

देशबंधू पांडे हे राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून तैनात असलेल्या देशबंधू पांडे यांना रेल्वे प्रशासनाने चार्जशीट दिली असून त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदीही घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होत असल्याची पूर्व माहिती दिली नसल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की, ५ ऑगस्टला मुख्यालयातून ई मार्केटप्लेस म्हणजेच संबंधित पेमेंट्सची परिस्थिती अपडेट करण्यासाठीचे आदेश देण्यात आले होते ज्यांची पूर्तता पांडे यांनी केली नव्हती. काम पूर्ण केल्याशिवायच देशबंधु पांडे यांनी ६ ऑगस्टला केबीसीचा उल्लेख केल्याशिवाय ९ ते १३ ऑगस्टदरम्यान सुट्टीसाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये फक्त महत्त्वाचं कारण, इतकाच उल्लेख करण्यात आला होता.

पत्रकात सांगितल्यानुसार सदर कर्मचाऱ्याकडून ९ ऑगस्टला जीईएमसंबंधित काम पूर्ण न केल्यासंबंधी, कामावर बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी, अनधिकृत पद्धतीनं अनुपस्थित राहण्याप्रकरणी वरिष्ठ डीएमकडून नोटीस देण्यात आली होती. पत्रकामध्ये चार्जशीटचाही उल्लेख करण्यात आला होता.

आणखी वाचा : वयाच्या ४०व्या वर्षी निधन झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे तरी कोण?

त्यानंतर देशपांडे यांचा २७ ऑगस्ट रोजी तीन वर्षांपर्यंतच्या वेतनवाढीला रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार सीएल, चार्जशीट, अनुपस्थितीचं उत्तर किंवा शिक्षेदरम्यान कुठेही केबीसीचा उल्लेख नाहीये. रेल्वेच्या म्हणण्यानुसार केबीसीतील त्यांच्या सहभागाबाबत प्राधिकारी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनाही कल्पना नव्हती. पांडे यांच्यावर दंड ठोठावण्याची वेळ आणि त्यांचा केबीसीतील सहभाग हा निव्वळ योगायोग असल्याचं सांगण्यात आहे.

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

पत्रकात म्हटल्यानुसार मागच्या अनेक सूचनांचं पालन करण्यात अपयशी राहिल्यानंतर ३ ऑगस्ट २०२१ रोजीसुद्धा त्यांच्याकडून कामाप्रती असणाऱ्या बेजबाबदार वृत्तीसाठी स्पष्टीकरण मागण्यात आलं होतं. कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षक असणाऱ्या देशबंधु पांडे यांनी आता कौन बनेगा करोडपती १३ मध्ये भाग घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळ त्यांनी केबीसीमध्ये बुद्धिमत्तेच्या जोरावर ३ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली. एकीकडे केबीसीमध्ये त्यांनी चांगला खेळ खेळला म्हणून त्यांचे सर्वजण कौतुक करत होते तर दुसरीकडे मुंबईहून परत येताच रेल्वे प्रशासनाने त्यांना चार्जशीट दिली आहे.