‘लस्ट स्टोरीज’ फेम अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी कियाराने बॉलिवूडमधल्या मित्रमंडळींसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. मुंबईत झालेल्या या पार्टीला करण जोहर, मनिष मल्होत्रा, शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा उपस्थित होते. या पार्टीव्यतिरिक्त कियाराने दाक्षिणात्य सुपरस्टारसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं.

मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरणसोबत कियारा वाढदिवशी खास डिनरसाठी गेली होती. राम चरण शूटिंगनिमित्त सध्या मुंबईत आहे. विशेष म्हणजे आगामी चित्रपटात कियारा त्याच्यासोबत काम करणार आहे. मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हे दोघं जेवायला गेले होते. यावेळी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते.

आणखी वाचा : ..म्हणून ४० कोटी मिळत असतानाही ‘अर्जुन रेड्डी’ने नाकारली करण जोहरची ऑफर

राम चरणने नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पदार्पण केलं. कियाराच्या वाढदिवशी त्याने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. कियारा आणि राम चरण आगामी ‘विनया विधेया रामा’ या तेलुगू चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.