किंग खान आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन अनोखे फंडे वापरत करताना दिसतोय. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूख गाइडची भूमिका साकारतोय. मागील दोन चित्रपटांत म्हणजेच ‘रईस’ आणि ‘डिअर जिंदगी’मध्ये त्याने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘जब हॅरी मेट सेजल’चीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. खरंतर शाहरूखची स्तुती करण्यासाठी अनेक मुद्दे आणि शब्द मिळतील. मात्र त्याचे काही ‘वीक पॉईंट’ तुम्हाला माहित आहेत का?

शाहरूखची सिगरेट पिण्याची सवय तर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र हीच सवय त्याचा ‘वीक पॉईंट’ असल्याचं तो म्हणतो. अनेक प्रयत्नांनंतरही सिगरेट पिण्याची सवय सुटत नसल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले. बॉलिवूडचा हा ‘रईस’ अभिनेता तसा तर नेहमी हसत, सर्वांची काळजी घेताना दिसतो. मात्र त्याचा रागही तेवढाच चर्चेत राहिलेला विषय आहे. २०१२ च्या आयपीएल सामन्यात वानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षकांसोबत झालेलं शाहरूखचं भांडण सर्वांनाच माहित असेल.

Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

वाचा : विराटच्या आधी ‘या’ क्रिकेटरला डेट करायची अनुष्का?

आपल्या व्यस्त कामकाजातून शाहरूख आपल्या कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो. आपल्या मुलांना वेळ देण्याला तो नेहमीच प्राधान्य देतो. कुटुंबावरील हे प्रेमच एकप्रकारे ‘वीक पॉईंट’ असल्याचं तो मानतो. किंग खानचा चौथ्या ‘वीक पॉईंट’बद्दल ऐकून तुम्हाला थोडंसं हसू येईल. धनादेशावर स्वाक्षरी करणे हा त्याचा एक ‘वीक पॉईंट’ आहे. अनेकदा धनादेशावर स्वाक्षरी करताना ‘विथ लव्ह, शाहरुख’ (ऑटोग्राफ) असे चुकून लिहितो. त्याची ऑटोग्राफ देण्याची सवय स्वाक्षरी करतानाही अडथळा ठरते.

वाचा : ‘…तर मी शेतकरी झाले असते,’ कंगनाचं सैफला प्रत्युत्तर

शाहरूखचे असे मत आहे की तो योग्य परिक्षक कधीच होऊ शकत नाही. याच कारणामुळे तो कोणत्याही नृत्य किंवा गायनस्पर्धेत परिक्षक म्हणून कधीच दिसला नाही. स्पर्धकांसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याचा ‘वीक पॉईंट’ असल्याचं तो म्हणतो. याशिवाय शाहरूखला रात्रीची लवकर झोप येत नाही. अनेकदा वेळेवर झोपण्याचा प्रयत्न केला तरी उशिराच झोप येते, असे तो म्हणतो. शाहरूखच्या ‘वीक पॉईंट’मध्ये इंग्रजी भाषेचाही समावेश आहे. सुरुवातीला इंग्रजी भाषा व्यवस्थित येत नसल्याने त्याला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र कठोर मेहनतीने ही उणीव त्याने कायमची दूर केली.