‘रॉकेट सिंग- सेल्समॅन ऑफ दी इयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या गौहर खानला कोणी ओळखत नाही असे होणे अशक्य. तिला खरी ओळख २०१२ मध्ये आलेल्या ‘इश्कजादे’ सिनेमापासून मिळाली. आपल्या अभिनयाने तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘बेगम जान’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमातील गौहरच्या व्यक्तिरेखाही लक्षात राहणाऱ्या होत्या.

लवकरच ‘या’ मालिकेतून प्रेक्षकांना नव्याने भेटणार मोनिका बेदी

chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
aajji bai jorat marathi play for kids based on artificial intelligence
आज्जीबाई जोरात
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

२३ ऑगस्ट १९८३ मध्ये पुण्यातील एका मुस्लीम कुटुंबामध्ये गौहरचा जन्म झाला. यशस्वी मॉडेल ते अभिनेत्री या प्रवासात तिने अनेक चढ-उतार पाहिले. पण तुम्हाला माहीत आहे का की २००३ मध्ये तिचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानसोबत साखरपुडा झाला होता. हे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे खरंय… एका मुलाखतीत खुद्द साजिदनेच साखरपुडा झाल्याची कबुली दिली होती. गौहर आणि साजिदच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण नंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि साखरपुडा मोडला.

गौहरचे नाव त्यानंतर अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. पण तिच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली ती ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वातला स्पर्धक अभिनेता कुशल टंडन याच्यासोबत. दोघांचे नाते जरी फार काळ टिकू शकले नाही तरी त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. कुशलशी ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव अभिनेता हर्षवर्धन राणेशी जोडले गेले होते. पण हर्षवर्धनने त्या दोघांमध्ये काहीही नसल्याचे आधीच स्पष्ट केले. गौहर माझी खूप चांगली मैत्रिण आहे. आम्ही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी खोटी असल्याचे त्याने सांगितले होते.