कबीर खान दिग्दर्शित सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘ट्युबलाइट’ Tubelight चित्रपट येत्या ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, सोहेल खान, ओम पुरी आणि बालकलाकार माटिन रे तंगूसोबतच चीनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. ‘ट्युबलाइट’च्या निमित्ताने सलमानने जेव्हा पहिल्यांदा झू झूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, तेव्हापासूनच या अभिनेत्रीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती.

भारत-चीन युद्धावर आधारित असलेला ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट आहे आणि झू झू जन्मसुद्धा एका सैनिकी कुटुंबात झाला. १९ जुलै १९८४ मध्ये बीजिंगमध्ये तिचा जन्म झाला. अभिनयात पदार्पण करण्याआधी गायनाची आवड असलेल्या झू झूने २००५ मध्ये ‘एमटीव्ही चीन’च्या एका संगीत कार्यक्रमात आणि त्यानंतर आणखी एका स्थानिक गायन स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यानंतर गायनामध्ये तिने राष्ट्रीय स्तरावरील तिसरे स्थान पटकावले. २००९ मध्ये तिचा पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता ज्यामुळे तिला चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच २०१० मध्ये चीनी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘व्हॉट वूमन वाँट’मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

‘ट्युबलाइट’ चित्रपटात काम करताना हिंदी भाषेतील संवाद शिकण्यासाठी झू झूने हिंदीचं विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतलं. नवीन भाषा शिकण्यासाठी झू झू आपल्या परिने कठोर मेहनत घेत जरी होती तरी ही भाषा संपूर्ण शिकण्यासाठी तिच्याकडे पुरेसा अवधी नव्हता. झू झूला लवकरात लवकर ही भाषा चांगल्याप्रकारे शिकता यावी यासाठी सलमानने तिची फार मदत केली होती. तिला संवादांचे अर्थ समजावून सांगणे, ओळींना लक्षात ठेवण्यासाठी सोपे मार्ग सांगण्याचे काम सलमानने केले.

वाचा : होणाऱ्या बाळासोबत सोहाने साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या पोस्टर, ट्रेलरमध्ये अनेकदा झळकलेली झू झू प्रमोशनसाठी मात्र अद्याप भारतात आली नाही. तिच्या भारत दौऱ्याची अजूनतरी योग्य आखणी केलेली नसून चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिला भारतात आणू अशी माहिती दिग्दर्शक कबीर खान यांनी दिली आहे. त्यामुळे ‘टयुबलाइट’ची टीम आणि सलमान खान या चीनी अभिनेत्रीला कशाप्रकारे प्रेक्षकांसमोर आणतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.