९३वा अकॅडमी पुरस्कार सोहळा उद्या पार पडणार आहे. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने होणार आहे. जगभरातल्या प्रेक्षकांसाठी हा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. जाणून घ्या भारतीय वेळेनुसार हा सोहळा कधी पाहायला मिळेल आणि कुठे!

यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याचे होस्ट असणार आहेत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनस. या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर झालेली आहेत. ती oscar.com या ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन जाणून घेता येतील. त्याचसोबत ऑस्करच्या विविध सोशल मीडिया अकाऊंट्सवरही या नामांकनांची यादी मिळेल.

कधी होणार ऑस्कर पुरस्कार सोहळा २०२१?

ऑस्कर पुरस्कार सोहळा आज म्हणजे रविवारी रात्री पार पडणार आहे. मात्र भारतीय वेळेनुसार हा सोहळा उद्या म्हणजे २६ तारखेला पहाटे ५.३०वाजल्यापासून सकाळी८.३० वाजेपर्यंत चालेल.

कुठे पाहता येईल हा पुरस्कार सोहळा?

जगभरातल्या करोना प्रादुर्भावामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा सोहळा ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन oscars.com वरुन पाहता येणार आहे. तसंच ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरुनही हा सोहळा पाहता येईल. अकॅ़डमीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुनही हा सोहळा दाखवण्यात येणार आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी रसिक उत्सुक आहेत. कारण गेल्या काही वर्षांपेक्षा वैविध्यपूर्ण चित्रपटांना नामांकनं आहेत.