सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार मराठी करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यामातून मिळते. नुकताच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते वडिलांच्या आठवणीत भावूक झाले.

नाना पाटेकर यांनी कोण होणार करोडपती कार्यक्रमातील कर्मवीर विशेष भागात हजेरी लावली. त्यावेळी ते वडिलांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या वडिलांविषयी विचारले होते. उत्तर देत नाना पाटेकर भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

आणखी वाचा : ‘दोन ऐवजी एक पोळी खाईन, पण तुझ्यासारखी पत्नी नको’, ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री झाली ट्रोल

‘माझ्या वडिलांना नाटक आणि सिनेमाचं फार अप्रूप होतं. तमाशाला बापाने मुलाला घेऊन जायचं हे किती विचित्र वाटेल. पण नाही. तू येऊन पाहा. त्या कलाकारांचा अभिनय पाहा असे ते म्हणायचे. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये माझी सांपत्तीक स्थिती नीट नव्हती. ज्यावेळी ते आजारी होते तेव्हा. दुर्दैवाने आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. औषधालाही पैसे नव्हते आमच्याकडे फारसे. मंगेश आणि मी शेवटी केईएम हॉस्पिटलच्या इथे बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो. तेव्हा वडील आतमध्ये जनरल वॉर्डमध्ये होते’ असे नाना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘त्याच्या आधी माझं महासागर नाटक जेव्हा सुरु झालं तेव्हा माझी नुकतीच सुरुवात त्यांनी पाहिली होती. तर काका मला म्हणाले मला ते पाहायच. मी वडिलांना काका म्हणायचो. मी त्यांना म्हटलं तुम्ही पाहिलय ना ते नाटक. ते म्हणाले नाही रे गेल्या वेळी मी पाहायला निघालो आणि चष्मा पडला. त्याच्यावर पाय पडला आणि तो फुटला. पण तुला वाईट वाटेल म्हणून बोललो नाही. यावेळी ते आजारी होते. त्यांना पायऱ्या चढायच्या नव्हत्या. मी त्यांना घेऊन शिवाजी मंदिरमध्ये गेलो होतो. मी तो प्रयोग फक्त माझ्या वडिलांसाठी केला होता. त्यांनतर त्यांना काही पाहाता नाही आलं. पण मला वडिलांना सांपत्तीक काही देता नाही आले. त्यांना पुढचे सिनेमे वैगरे पाहाता आले नाहीत.’