अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी सिनेमा ‘मीमी’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या सिनेमात क्रिती सरोगेट आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र या सिनेमात गरोदर मुलीची भूमिका साकारणं क्रितीसाठी खूपचं आव्हानात्मक असल्याचं ती एका मुलाखतीत म्हणाली आहे. शिवाय या भूमिकेमुळे क्रिती इतकी घाबरली आहे की खऱ्या आयुष्यात आता मुलाल जन्म देण्याबद्दल शंका वाटत असल्याचा खुलासा क्रितीने केलाय.

नुकत्याच बॉलिवूड बलबलला ‘मीमी’ सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत क्रितीने तिच्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी क्रिती म्हणाली, “मी यूट्यूबवर बरेच खऱ्या डिलिव्हरीचे व्हिडिओ पाहिले आणि मी एवढचं म्हणू शकते की आता खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म देण्याच्या कल्पनेचीच मला भीती वाटू लागलीय. मला खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही याची देखील खात्री नाही. सिनेमाचा दुसऱा भाग माझ्यासाठी खूप कठिण होता. खास करून जेव्हा मीमी आई होते. या सीनचा संबध जोडणं कठिण होतं कारण प्रसूती म्हणजे केवळ शारीरिक बदल नाही तर मानसिक बदलही असतो. सिनेमातील प्रसूतीचा सीन करणं सर्वात कठीण होतं आणि मी खूपच घाबरले होते.” असं क्रिती म्हणाली.

हे देखील वाचा: करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

हे देखील वाचा: जेव्हा मोलकरणीला मारझोड केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आली होती अभिनेत्री किम शर्मा

‘मीमी’ सिनेमातील प्रसूतीच्या सीनबद्दल सांगताना क्रिती म्हणाली, “अनेक हिंदी सिनेमांमध्ये प्रसूतीच्या दृश्यामंध्ये हलकी फुलकी कॉमेडी दाखवली जाते किंव काही वेळेला त्या सीनमध्ये प्रसूतीचे बारकावे न दाखवत साधेपणाने सीन केला जातो. मात्र आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना या सीनमध्ये वास्तविकता हवी होती. ते म्हणाले की तुला पाहून एखाद्या पुरुषाला त्या वेदना जाणवल्या पाहिजेत. त्या पुरुषांना हे लक्षात यायला हवं एक स्त्री प्रसूतीच्या वेळी कोणत्या वेदनांचा सामना करते आणि त्यानंतर त्यांना पत्नीचा अभिमान वाटायला हवा, असं दिग्दर्शकाने थोड्याकात समजावलं होतं.” असं क्रिती म्हणाली.

दरम्यान ‘मीमी’ हा सिनेमा समृद्धी पोरे यांच्या २०११ सालातील ‘आई व्हायचंय मला’ या राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय . हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.