नुकताच बॉलिवूड अभिनेता वरून धवन, मनिष पॉल आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार क्रितीला करोनाची लागण झाली आहे. मात्र, स्वत: क्रितीने याबाबत माहिती दिलेली नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटाचे चित्रीकरण चंढीगडमध्ये सुरू असून तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता राजकूमार राव दिसणार आहे. पण आता क्रितीला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वरुण धवन, नीतू कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना करोनाची लागण झाली. अभिनेत्री नीतू कपूर सध्या मुंबईला परतल्या आहेत. तर वरुण चंढीगडमध्ये क्वारंटाइनमध्ये आहे. त्याच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता देखील चंदीगडमध्येच आहेत. सध्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरपर्यंत थांबवण्यात आलं आहे.