सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. प्रत्येक महिन्यात आपल्याला एखाद्या तरी लग्नाला जावेच लागते. आता प्रत्येक लग्नाला काय घालायचं हा प्रश्न आपल्यासमोर असतो. अशावेळी गुगलवर डिझायनर लेहंग्यासाठी अनेक मुली सर्च करतात. पण आता तुम्हाला डिझायनर लेहंगा घालायचा असेल आणि त्यात तुम्हाला उत्तम पद्धतीने वावरयाचे असेल असेल तर बॉलिवूडच्या या दोन हॉट अभिनेत्रींचे फोटो पाहाच. नुकतेच क्रिती सनॉन आणि वाणी कपूर यांनी आकर्षक डिझायनर लेहंगा घातला होता. हे लेहंगे पारंपारिक तसेच पाश्चिमात्य फॅशनचे सुरेख मेळ साधतात. क्रितीने गुलाबी रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती तर वाणीच्या लेहंग्यामध्ये सोनेरी आणि फिकट पांढऱ्या रंगांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते.

क्रितीने अनिता डोंगरेचा डिझायनर लेहंगा घातला होता. सेलिब्रिटी स्टायलिस्ट सुक्रिती ग्रोवरने मोठे झुमके आणि अंगठीने तिचा हा लूक अजून खुलवला होता. तिच्या या लूकला साजेसा मेकअप केल्यामुळे तिच्यावरुन नजरच हटत नाही. गुलाबी आणि सोनेरी रंगाची रंगसंगती नेहमीच आकर्षक दिसते. जर तुम्ही एखाद्या गडद रंगाचा लेहंगा घालणार असाल तर त्यावर कमीत-कमी मेकअप करा.

वाणी कपूरने अॅमी बिलीमोरियाने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. चंदेरी, सोनेरी आणि पांढऱ्या रंगाची सर्वोत्तम रंगसंगती या लेहंग्यामध्ये वापरलेली दिसते. झरदोसी वर्क असलेल्या या लेहंग्याच्या ओढणीला पोलका डॉट दिले असल्यामुळे ओढणीही आकर्षक दिसते. केस मोकळे सोडून त्याला कर्ल्स दिल्यामुळे ते अधिक उठावदार दिसतात. पण मेकअप-मध्ये अजून सुधारणा करता आली असती असे हा फोटो पाहून नक्कीच म्हणता येईल. तुम्हाला वाणी आणि क्रिती यांच्यापैकी कोणाचा लेहंगा लूक आवडतो ते नक्की सांगा.