करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघात विषाणूविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अगदी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण मदतचीचे हात पुढे करत आहेत. परंतु या काळात अंबानी सारख्या व्यवसायिकांनी केवळ वैयक्तिक नफ्यासाठी मदत केली असा आरोप अभिनेता कमाल खानने केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – केस घरातच कापले का?; अभिनेत्रीचा ‘हा’ फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

नेमकं काय म्हणाला कमाल खान?

“अंबानी, अदानी, टाटा यांसारख्या मोठ्या व्यवसायिकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी कोट्यवधींची मदत केली. परंतु आपल्या गावी परतण्यासाठी धडपडणाऱ्या गरीब मजुरांना त्यांनी ट्रेनची तिकीट मात्र काढून दिली नाही. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी गरीबांच्या मदतीसाठी पैसे दान केले नाहीत. उलट वैयक्तीक नफ्यासाठी त्यांनी ही मदत केली होती.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – शाहरुखनं गायलेलं ‘हे’ गाणं ऐकून अबराम म्हणाला, बस झालं बाबा…

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच आपले मतप्रदर्शन करत असतो. यावेळी त्याने भारतातील मोठ्या व्यवसायिकांवर निशाणा साधला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.