कमाल राशिद खान म्हणजेच केआरके कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. स्वयंघोषित चित्रपट समीक्षक असलेला केआरके बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत कायम पंगा घेताना दिसतो. केआरकेने सलमान खान, मिक्का सिंह आणि कंगना रणौतनंतर आता त्याचा मोर्चा अभिनेत्री तापसी पन्नूकडे वळवला आहे. केआरकेने तापसीचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘हसीन दिलरुबा’वर निशाणा साधला आहे. केआरके तापसीला सी ग्रेड अभिनेत्री म्हणाला आहे. तसचं सिनेमादेखील सी ग्रेड असल्याचं तो म्हणाला.

तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा २ जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. यावर केआरकेने एक ट्वीट केलंय. यात तो म्हणाला, “अनेकजण मला हसीन दिलरुबाचा रुव्ह्यू करण्यासाठी सांगत आहेत. पण मला नाही माहित हा सिनेमा केव्हा आणि कुठे रिलीज झालाय. दुसरी गोष्टी म्हणजे मी सी ग्रेड अ‍ॅक्टर्स आणि सी ग्रेड सिनेमांचा रिव्ह्यू करत नाही. कारण मी..मी डॉक्टर केआरके जगातील नंबर वन समीक्षक आहे.” असं ट्वीट करत केआरकेने तापसी पन्नूला सी ग्रेड अभिनेत्री असं म्हंटलं आहे.

हे देखील वाचा: अनुष्का शर्माने पती विराट कोहलीला दिली टक्कर; विरुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री असून या सिनेमात तापसी पन्नूसोबत अभिनेता हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केलंय.

दरम्यान, एखाद्या सिनेमावर किंवा कलाकारावर टीका करण्याची केआरकेची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील केआरकेने सलमान खान आणि त्याच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ या सिनेमावर टीका केली होती. या प्रकरणानंतर दंबग खानने केआरकेवर मानहानीचा खटला देखील दाखल केला होता.

Story img Loader