अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात मुंबई कोर्टात मानहानीचा दावा ठोकला आहे. आता सोशल मीडियावर एक पोस्ट करत केआरकेने विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग यांचे नाव घेतले आणि सलमानने या वेळी चुकीच्या माणसाशी पंगा घेतला असे म्हटले आहे.

केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “विवेक, जॉन, अरिजीत बिचारी साधी मुल होती. पण यावेळी त्याने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे!,” असे ट्वीट केआरकेने केले आहे. केआरकेनेचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “कमाल खान या बिंग ह्युमनला धडा शिकवण्यासाठी आम्ही तुला साथ देतो.”

या आधी केआरकेने सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाचा रिव्ह्यु दिला होता. १३ मे रोजी ईदच्या दिवशी सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केआरकेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने ‘राधे’ चित्रपटाचा निगेटिव्ह रिव्ह्यू केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं, “चित्रपट ‘राधे’मध्ये काय विशेष आहे माहित नाही…’राधे’ हा चित्रपट मी दुबईमध्ये पाहिली…या चित्रपटाच्या मध्यांतानंतर चित्रपटगृहात जाण्याची इच्छाच झाली नाही.”

केआरकेनं आणखी एक ट्वीट शेअर करत आपलं म्हणणं मांडलं. तो म्हणाला, “मला जर एखाद्या प्रोड्यूसर किंवा अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करायचा नाही, असं सांगितलं तर यापुढे मी त्यांच्या कोणत्याच चित्रपटाचा रिव्ह्यू नाही करणार.. सलमान खानने माझ्यावर मानहानीचा दावा केलाय, याचा अर्थ मी केलेल्या रिव्ह्यूवर तो नाराज आहे…म्हणूनच यापुढे मी त्याच्या कोणत्याच चित्रपटाचा रिव्ह्यू करणार नाही…माझा हा शेवटचा व्हिडीओ आज शेअर करतोय.”

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

दरम्यान, सलमानच्या टीमने ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगितले आहे. केआरकेने ट्वीट आणि व्हिडीओ शेअर करत आरोप केला की, सलमान खानने मानहानीचा दावा हा चित्रपटाच्या रिव्ह्युवरुन केल्याचे सांगितले. मात्र, हे चुकीचे आहे. सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड बिंग ह्युमन हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत असा आरोप केला, त्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader