बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना आणि सैफ नेहमीच चर्चेत असतात. त्यात तैमूरचे लाखो चाहते आहेत. तर, करीनाचा दुसरा मुलगा जेहला पाहण्याची चाहत्यांची इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही. करीना आणि सैफ यांनी त्यांच्या मुलांना दिलेल्या नावांवरून वाद झाला होता. आता अभिनेता कमाल आर खानने तैमूर आणि जेहच्या भविष्यावर वक्तव्य केलं आहे.

केआरकेने ट्वीट करत कंगना, प्रियांका आणि निक यांच्या विषयी भविष्यवाणी केली. तर आता त्याने ट्वीट करत करीना आणि सैफ अली खान यांच्या मुलांविषयी एक भविष्यवाणी केली आहे. “करीना आणि सैफची दोन्ही मुलं त्यांच्या नावामुळे यशस्वी अभिनेते होऊ शकणार नाही”, अशा आशयाचे ट्वीट करत केआरकेने तैमूर आणि जेहच्या करिअरविषयी भविष्यवाणी केली आहे.

आणखी वाचा : जॅकलिनने पुन्हा एकदा केल टॉपलेस फोटोशूट, पाहा फोटो

एवढंच नाही तर केआरकेने प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या नात्याविषयी देखील एक भविष्यवाणी केली आहे. “पुढच्या १० वर्षांमध्ये निक प्रियांकाला घटस्फोट देईल”, असे ट्वीट केले आहे. या सोबत “कंगना कधीच लग्न करणार नाही”, असे ट्वीट देखील त्याने केले आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

एखाद्या कलाकारावर टीका करण्याची केआरकेची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील केआरकेने सलमान खान, मिका सिंग, कंगना रणौत आणि रणबीर कपूरवर टीका केली होती.

Story img Loader