छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ या शोमधील प्रत्येक कलाकार त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यातच आपल्या विनोदाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा कृष्णा अभिषेकला शोचा हुकुमी एक्का मानलं जातं. स्टेजवरील त्याच्या वावरामुळे या शोची रंगत वाढते. परंतु अलिकडेच झालेल्या भागामध्ये कृष्णाने हा शो सोडण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्याच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. परंतु कृष्णाने हे वक्तव्य विनोदाने केलं असून हा शो सोडल्यानंतर त्याला काय करायचंय हेदेखील त्याने सांगितलं.

काही दिवसांपूर्वी झालेल्या भागात अभिनेता सैफ अली खान त्याच्या ‘जवानी जानेमन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या मंचावर आला होता. यावेळी चित्रपटाच्या टीमसोबत शोमधील कलाकारांची मज्जा-मस्ती सुरु असताना कृष्णाने त्याला हा शो सोडण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

“मला कपिल शर्मा शो सोडून तैमुरची नॅनी व्हायचं आहे. तैमुरची नॅनी झाल्यानंतर मी केवळ तैमुरचं नाही तर त्याच्या बाबांचीदेखील काळजी घेईन”, असं कृष्णा म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर मंचावर एकच हशा पिकला. परंतु कृष्णाला खरोखरंच हा शो सोडायचा नसून त्याने केवळ विनोद म्हणून हे वक्तव्य केलं. कृष्णा कायमच त्याच्या विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.

वाचा : ‘या’ ट्रीकमुळे प्रियांका झाली नाही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार

दरम्यान, तैमुरचा सांभाळ करणाऱ्या नॅनीला जवळपास १.५ लाख रुपये मानधन मिळत असल्याचं सांगण्यात येतं. तसंच त्यांनी अतिरिक्त काम केल्यावर त्यांना त्याचे वेगळे पैसेही मिळतात. सैफचा ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमद्ये १२.८३ कोटींची कमाई केली आहे.

 

Story img Loader