काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता त्या पाठोपाठा झी मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्या ऐवजी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण सुरु झाले होते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सुमी आणि समर पुढचे काही दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. १२ सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटा भाग प्रदर्शित होणार आहे.

आता या मालिकेच्या वेळात संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर “लाडाची मी लेक ग” ही नवीन मालिका प्रेक्षकांना दिसणार आहे. ही मालिका १४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल असून, प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader