‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटाने सर्वांवर छाप सोडणारे हॉलीवूड अभिनेता पीटर ओटूल यांचे प्रदीर्घ निधन झाले आहे. ८१ वर्षीय ओटूल हे काही दिवसांपासून आजारी होते. लंडनमधल्या वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ओटूल यांनी लॉरेन्स ऑफ अरेबियानं केलेले कथन आजही अजरामर आहे. जागतिक महायुद्धादरम्यान या चित्रपटाचा नायक लॉरेन्सनने आत्महत्या केली की त्याचा अपघात झाला, याबाबत गूढ चित्र निर्माण करणारी ही कथा आजही अजरामर आहे. निळ्याशार डोळ्यांचा आणि अरोबियन वेशभूषेतला आकर्षक नायक आजही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांना आतापर्यंत ८वेळा ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले होते. पण, त्यांना एकदाही ऑस्कर हातात घेण्याची संधी मिळाली नाही. अखेर २००३ साली त्यांना ऑस्करचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ओटूल यांनी आपल्या अभिनयाने ५० वर्षांपेक्षा जास्त काळ हॉलिवूडवर राज्य केले.

Story img Loader