फॅशन जगतामध्ये अनन्य साधारण महत्व असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ ला सुरुवात झाली. या महोत्सवात गरोदर अभिनेत्री लिसा हेडनने रॅम्प वॉक करून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र रॅम्पवर चालत असताना लिसाचा पाय साडीत अडकला आणि ती पडण्यापासून थोडक्यात बचावली. सध्या लिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फॅशन शोमध्ये लिसा ही फॅशन डिझायनर अमित अग्रवालच्या फॅशन शोची शो स्टॉपर होती. साडी नेसून ती रॅम्पवर जेव्हा उतरली तेव्हा प्रेक्षकांनी तिचं जोरदार स्वागत केलं. पण दोन-तीन पावलं चालल्यावर साडी पायात अडकल्याने ती रॅम्पवर अडखळली. मात्र लिसाने तात्काळ तोल सांभाळून त्याच आत्मविश्वासाने हा रॅम्प वॉक पूर्ण केला.

पाहा फोटो- बॉबी देओलच्या मुलावर नेटकरी फिदा

अनेक वेळा हॉट फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत येणारी लिसा दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने बीचवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये लिसाचा बेबी बंप दिसून येत होता. गरोदर असताना फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करणारी लिसा पहिलीच अभिनेत्री नाही. करिना कपूर खान आणि नेहा धुपिया यांनीसुद्धा गरोदर असताना रॅम्प वॉक केला होता. मॉडेलिंग विश्वातील काही जुन्या समजुतींना छेद देण्याचं काम या अभिनेत्री आणि मॉडेल्सनी केलं होतं.

पाहा फोटो- महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण

लिसाने डिनो लालवानीसोबत लग्न केलं आहे.लिसा आणि डिनोने कोणताही गाजावाजा न करता गुपचूप विवाह केला होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत ही माहिती साऱ्यांना दिली. डिनो हा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा असून २००८ साली त्याने बिनॅटोन टेलिकॉम या त्याच्या वडिलांच्या कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

Story img Loader