हेरगिरीच्या आरोपाखाली कैदेत टाकलेले भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला पाकिस्तानने अपमानजनक वागणूक दिल्याबद्दल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना देण्यात आलेल्या वागणूकीबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते, उदारमतवादी आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी मौन बाळगल्याने भांडारकरांनी राग व्यक्त केला.

वाचा : युवराजने विराट-अनुष्काला दिले ‘क्यूट’ नाव

भांडारकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिलं की, जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानमध्ये ज्याप्रकारे वागणूक मिळाली ती हादरवून टाकणारी आहे. मात्र, मानवाधिकार कार्यकर्ते, उदारमतवादी आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी यावर बाळगलेलं मौन अधिक भयावह आहे.

TOP 10 NEWS वाचा : नाना पाटेकर यांच्यापासून विरुष्कापर्यंत मनोरंजन विश्वातील सर्व घडामोडी

कुलभूषण जाधव यांना भेटायला सोमवारी त्यांची आई आणि पत्नी इस्लामाबाद येथे गेल्या होत्या. मात्र, जाधव यांना त्यांच्याशी मराठीतून संवाद साधू दिला नाही. तसेच एक काचेची भिंत मधे घालून ही भेट घडवण्यात आली. सुरक्षेचे कारण देऊन जाधव यांच्या पत्नीला मंगळसूत्रही काढायला लावले आणि त्यांच्या पत्नीला आणि आईला कपडेही बदलायला सांगितले होते अशी सुत्रांनी माहिती दिली होती. एवढेच नाही तर या भेटीनंतर पाकिस्तानचे आभार मानणारा कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओही तातडीने प्रसारित करण्यात आला. मात्र जाधव यांच्या कुटुंबियांना अत्यंत हीन वागणूक देण्यात आली. या अपमानास्पद वागणुकीवर सार्वत्रिक टीका होते आहे.