बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत स्पर्धकांना प्रोस्ताहन देत आहे. या शोमध्ये कायमच वेगवेगळे पाहूणे येऊन स्पर्धकांचं मनोबल वाढवत असतात तसचं स्पर्धकांच्या डान्सचं कौतुक करताना दिसतात. या शोमध्ये लोकप्रिय फिल्म मेकर सुभाष घई यांनी गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. हा स्पेशल भाग सुभाष घई यांना डेडिकेट करण्यात आला होता.
अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत या खास एपिसोडची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओत ती सुभाष घई यांच्यासोबत ‘खलनायक’ या सिनेमातील ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्याचा BTS व्हिडीओ म्हणजेच सेटवरील पडद्यामागचा व्हिडीओ पाहताना दिसतेय.
या बीटीएस व्हिडीओत १९९३ सालात लोकप्रिय ठरलेल्या ‘खलनायक’ सिनेमातील गाजलेलं गाणं ‘चोली के पिछे क्या है’चं शूटिंग सुरू असल्याचं दिसतंय. यात सुभाष घई कॅमेरासमोर माधुरीने कसं परफॉर्म करणं अपेक्षित आहे हे सांगत आहेत. तर दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान माधुरीला डान्सचे धडे देताना दिसत आहेत. सरोज खान मोठ्या एनर्जीने डान्स स्टेप करत माधुरीला त्या स्टेपस् समजावताना दिसत आहेत. तर सुभाष घई देखील अध्ये मध्ये सरोज खान यांच्यासोबत डान्सचा ठेका धरताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सरोज खान यांचा उत्साह पाहून सुभाष घई आणि माधुरी दीक्षितने टाळ्या वाजवल्या. तर सरोज खान यांना पाहून दोघंही भावूक झाले.
View this post on Instagram
१९९३ सालातील हा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई काही काळासाठी भूतकाळात रमले. माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओल अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अंकिता लोखंडे तसचं टायगर श्रॉफने कमेंट करत पसंती दिली आहे. माधुरीच्या या गाण्याने त्या काळी अनेकांना घायाळ केलं होतं.
दरम्यान या खास एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितने सुभाष घई यांच्यासोबत केलेल्या अनेक सिनेमांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.