बॉलिवूडचे शहेनशहा अर्थातच अमिताभ बच्चन हे त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासह ‘बंटी और बबली’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात ऐश्वर्याने ‘कजरा रे’ हे आयटम साँग केले आणि ते प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास १६ वर्षे उलटून गेली आहेत. तरी देखील अनेक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर डान्स पाहायला मिळतो. आता बॉलिवूडमध्ये एकेकाळी अभिनय आणि नृत्य कौशल्याने अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने ऐश्वर्याच्या ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
सध्या माधुरी कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. तिच्यासोबतच तुषार कालिया आणि धर्मेश एलंडे देखील परिक्षक म्हणून कार्यक्रमात दिसत आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर माधुरी अनेकदा मजामस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा सेटवर ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ‘डान्स दीवाने ३’ कार्यक्रमातील एका भागाचे चित्रीकरण सुरु असताना शूट करण्यात आला आहे.
पाहा : २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील ‘या’ आलिशान बंगल्यात
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘उगाच हीरोपंती करु नका’, टायगर-दिशावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा इशारा
व्हिडीओमध्ये माधुरीसोबतच धर्मेश आणि तुषार देखील डान्स करताना दिसत आहेत. माधुरीचा भन्नाट डान्स पाहून चाहते फिदा झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी ऐश्वर्याचा डान्स आवडला की माधुरीचा हे कमेंट करत सांगितले आहे. दरम्यान माधुरीने आकाशी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी देखील माधुरीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर डान्स करतानाच व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती ‘कभी खुशी कभी गम’ या हिट चित्रपटातील ‘बोले चूडिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘डान्स दीवाने ३च्या चित्रीकरणादरम्यान’ असे कॅप्शन दिले होते.