दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूचे चाहते भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. गेल्या आठवडाभरापासूनच सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाची चर्चा सुरू आहे आणि आपल्या चाहत्यांसाठी त्याने खास भेट दिली आहे. आगामी ‘महर्षी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक महेश बाबूने प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सध्या ट्विटरवरही याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
‘ऋषी ही व्यक्तिरेखा साकारून मी माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे,’ असं ट्विट महेशने केलं आहे. हातात लॅपटॉप आणि कॅज्युअल लूकमधला त्याचा हा फोटो चाहत्यांना फार आवडला आहे. या चित्रपटाचं देहरादून इथलं शूटिंग नुकतंच संपलं असून पुढचं शूटिंग गोव्यात पार पडणार आहे. यात महेशची नेमकी काय भूमिका आहे आणि चित्रपटाचं कथानक कशावर आधारित आहे हे अद्याप स्पष्ट नाही.
Embarking on my new journey as RISHI.#MAHARSHI pic.twitter.com/xiAylLc2ND
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) August 8, 2018
वाचा : ‘तख्त’साठी लढणार रणवीर- विकी; करण जोहरने केली बिग बजेट चित्रपटाची घोषणा
उत्तम कथानकासोबतच मनोरंजनपूर्ण असे महेश बाबूचे चित्रपट असतात. बॉक्स ऑफीसवर त्याच्या बहुतांश चित्रपटांनी बक्कळ कमाई केली आहे. महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी लाखो चाहत्यांची इच्छा आहे. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चासुद्धा रंगल्या होत्या. मात्र बॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारण्याचा अद्याप त्याचा विचार नसल्याचं पत्नी नम्रता शिरोडकरने स्पष्ट केलं.