चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे आगामी ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर त्यांनी स्वतःहून हीच भूमिका करणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांना सांगून टाकले होते. ‘टेक केअर गुड नाईट’ हा गिरीश जयंत जोशी दिग्दर्शित चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

महेश मांजरेकर यांच्यासह या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जयंत जोशी यांनी काही वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ हा पुरस्कार विजेता चित्रपट एकत्र केला होता. तेव्हाच या तिघांमध्ये पुन्हा एखादा चित्रपट एकत्रित करण्याचे ठरले होते. जेव्हा जोशी यांनी या दोघांना ‘टेक केअर गुड नाईट’ची कथा ऐकवली तेव्हा या दोघांनीही लगेच होकार दिला. दोघांनाही की कथा आवडली होती. सचिन खेडेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेबरोबरच महेश मांजरेकर यांची वेगळी भूमिका यात असल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

वाचा : शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार खुशी कपूर 

“टेक केअर गुड नाईट’ची कथा हे तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणारी आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाला सरावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अशाप्रकारच्या सायबरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्या मांडताना हा चित्रपट त्यावरील उपाय आणि बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल भाष्यही करतो. हा सामाजिक संदर्भ ध्यानात घेवून मी या चित्रपटात काम करायचे ठरवले. मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन हा चित्रपट आपल्याला देऊन जातो,” असे महेश मांजरेकर म्हणतात.

“सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. सायबर क्राईम कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही यातून अनुभवू शकता. तंत्रज्ञानाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये, याचे नेमके भाष्य यात आहेत,” लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी म्हणाले.