लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे खरंच ‘महाराष्ट्र भूषण’ होते. महाराष्ट्राचे लाडके ‘भाई’ अर्थात पुलंच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटकं आणि चित्रपट झालेत. पण आता पुलंचीच जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी महेश मांजरेकर यांनी सुरू केली आहे. या बॅनरअंतर्गत हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. यावर्षी पुलंच्या जयंतीदिनी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वाचा : अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडताना ‘संजू’ 

यामध्ये ‘भाई’ कोण साकारणार, सुनीताबाईंच्या भूमिकेत कोण दिसणार, पटकथा, संगीत, संवाद कोणाचे असणार, या सर्व गोष्टी उद्या म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहेत.