तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी सौंदर्यवती माहिरा खान या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून नेटिझन्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. रणबीर – माहिरा एकमेकांना डेट करत आहेत का? ते दोघे न्यूयॉर्कमध्ये एकत्र कधी गेले? हे दोघं गुपचूप हॉलिडेसाठी गेले आहेत का ? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्याबद्दल चर्चा होणं स्वाभाविकच आहे. पण, या चर्चेने आता उग्ररुप धारण केल्याचे दिसते. माहिराने ‘पाकिस्तानी’ असूनही बॅकलेस ड्रेस घातला आणि ती फोटोंमध्ये धूम्रपान करताना दिसत असल्यामुळे तिच्यावर अर्वाच्च शब्दांमध्ये नेटीझन्सनी टीका केलीय.

वाचा : ५१ वर्षीय अभिनेत्री ३५ वर्षांच्या संगीत दिग्दर्शकाला करतेय डेट

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या फोटोंवर प्रतिक्रिया देत पाकिस्तानी नेटिझन्सनी माहिरासाठी केवळ अपशब्दच वापरलेले नाहीत तर तिला दांभिक म्हणत पाकिस्तानमध्ये परत येऊ नकोस, अशी चेतावणीही दिली.

https://twitter.com/anoldsoul3/status/910969918572699648

https://twitter.com/Haroonayy/status/910962956959133697

पण, याचसोबत काही नेटिझन्स माहिराच्या समर्थनार्थ पुढे सरसावले असून, तिच्या कपड्यांवरून किंवा ती कशी वागतेय यावरून तिचे परिक्षण करुन नये, असे म्हटलेय. सोशल मीडियावर जणू ‘माहिरा विरुद्ध अॅण्टी माहिरा’ अशी चर्चा सुरु झाली आहे.

वाचा : फ्लॅशबॅक असली गब्बरसिंग, नकली शोले…

https://twitter.com/AnichaX/status/911048535835111424

दरम्यान, रणबीर सध्या न्यूयॉर्कमध्ये अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. ‘योगायोगाने’ माहिराही न्यूयॉर्कमधील एका हॉटेलात उतरली होती. तिच्या हॉटेलबाहेर हे दोघे धूम्रपान करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘रईस’ फेम माहिराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसते. तर रणबीर त्याच्या दत्त लूकमध्ये पाहावयास मिळतोय. हे तथाकथित प्रेमीयुगुल धूम्रपान करताना काहीतरी गप्पा मारत असल्याचे फोटोवरून कळते.

गेल्या वर्षी ‘ग्लोबल टीचर प्राइज’ सोहळ्यात या दोघांनीही हजेरी लावली होती. तेव्हापासूनच यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आले. त्यावेळी रणबीर – माहिरामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, आम्ही केवळ एकमेकांशी बोलत होतो, असे दोघांनीही नंतर म्हटले. तसेच, त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही धुडकावून लावल्या.