‘माझा होशील ना’ या मालिकेतील सई आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत आणि ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. आयुष्यातला पहिला पगार हा प्रत्येकासाठीच खास असतो. त्या मिळालेल्या पगारातून जवळच्या माणसासाठी घेतलेली पहिली भेटवस्तू तर त्याहून मौल्यवान असते. गैरसमजातून म्हणा किंवा अनवधानाने आदित्य सईचं मन दुखावतो, पण नंतर त्यालाही चुकल्यासारखं वाटतं. सईसाठी पहिल्या पगारातून काहीतरी घ्यायला हवं असं तो ठरवतो.
सईतला खरेपणा हीच तिची खरी ओळख आहे. आदित्य सईला रातराणीच्या फुलाच्या डिझाइनचे कानातले आणतो. या सीनसाठी मालिकेच्या टीमने खास हे चांदीचे कानातले बनवून घेतले. सईला ही अनोखी भेट आवडेल का आणि यात भेटीतून मैत्रीच रूपांतर प्रेमात होईल का हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागांत पाहायला मिळेल.
माझा होशील ना ही मालिका सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होते.