हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलेल्या आलिशान आणि महागड्या गाड्या आपल्याकडील बॉलिवूड कलाकारांकडे दिसणे ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. राजकारणी, उद्योगपती आणि धनाढ्य व्यक्तींप्रमाणेच बॉलिवूडच्या कलाकारांकडे या गाड्या सर्रास पाहायला मिळतात. हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटांत पाहिलेल्या अशा गाड्या घेणे ही फक्त बॉलिवूड कलाकारांची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार व दिग्दर्शकांकडेही आता महागड्या आणि आलिशान गाड्या दिसू लागल्या आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील हिनेही नुकतीच तिची पहिली गाडी घेतली आहे.
वाचा : मोठा दिग्दर्शक होईन असा अमरापूरकर यांना विश्वास होता
रसिकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा चाहता वर्गही दिवसागणिक वाढतोय. त्यामुळेच रसिका इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. तसेच, तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टीही शेअर करते. आपली पहिलीच गाडी घेण्याचा आनंदही तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला. रसिकाने ‘ह्युंडाई क्रेटा’ ही पांढऱ्या रंगाची गाडी घेतली. नव्या गाडीसोबतचे फोटो शेअर करत तिने लिहिलं की, ‘अरे आली रे…. माझी पहिली नवीन गाडी….’ या पोस्टमध्ये रसिकाने तिच्या वडिलांचेही आभार मानले आहेत.
वाचा : ‘या’ कारणामुळे बाथरूममध्ये होत होत्या आमिरच्या मिटींग्ज
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. मालिकेचे कथानक, त्यात दिवसागणिक येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. विशेषतः राधिका – शनायाची जुगलबंदी आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची होणारी फजिती यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश आहे.