शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावे यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज आहे, असा सल्ला अनेक वेळा योगाभ्यासक देतात. विशेष म्हणजे सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आज योगाभ्यासाला महत्व देत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु तुम्ही ज्या सेलिब्रिटींच्या फिटनेसचे चाहते आहात. त्यांना देखील भुरळ घालणारे एक अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे. या महिलेचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून सेलिब्रिटीही तिच्या या अनोख्या योगा शैलीचे दिवाने आहेत.

 

why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
View this post on Instagram

 

When was the last time you noticed the sound of your own breathing? #NUEDisnormal

A post shared by Nude Yoga Girl (@nude_yogagirl) on

इन्स्टाग्रामवर ‘न्यूड योगा गर्ल’ (Nude Yoga Girl) नामक एक अकाऊंट आहे. २०१५ साली सुरु करण्यात आलेल्या या अकाऊंटचे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही महिला अनेक कठीण योग मुद्रा करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. तिचे हे योगा करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

केवळ योगा करुन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवणारी ही महिला कोण आहे? तिचे नाव काय? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती इन्स्टाग्रमावर उपलब्ध नाही. परंतु अभिनेत्री मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, टीवी अभिनेत्री एबीगल जैन, निशा रावल, आशका गोराडिया यांसारखे अनेक नामांकित कलाकार ‘न्यूड योगा गर्ल’ हे अकाउंट फॉलो करतात.