सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे मलायका अरोरा. सोशल मीडियावर मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होताना दिसतात. नुकताच मलायकाने करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण केंद्रावर गेलेल्या मलायकला फोग्राफर्सनी स्पॉट केलंय. लसीकरण केंद्रातून बाहेर येतानाचा मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मलायका लसीकरण केंद्रातून बाहेर येत तिच्या गाडीच्या दिशेने जाताना दिसतेय. यावेळी मलायकाने काळ्या रंगाचं जॉगर्स आणि जॅकेट परिधान केल्याचं दिसतंय. मलायकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गराडा घातल्याचं पाहायला मिळतंय.मलायकाचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. सोशल मीडियावर मलायकाचे लोखो चाहते असले तरी मलायकाचा हा बोल्ड लूक पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
View this post on Instagram
लस घेण्यासाठी गेलेल्या मलायकाला तिच्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलंय. एक नेटकरी म्हणालाय, “लस घ्यायला गेली होती कि जीमला.”तर दुसरा युजर म्हणाला, “लस घेण्यासाठी गेली होती की अंगप्रदर्शन करायला, थोडा तरी सेन्स हवा.” आणखी एक युजर म्हणाला, “आतमध्ये कदाचित फोटोशूट होतं.” असं म्हणत काही नेटकऱ्यांनी मलायकाच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलंय.
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या अफेरमुळे कायमचं चर्चेत असते. नुकताच अर्जुन कपूरने त्याचा वाढदिवस साजरा केलाय. यावेळी मलायकाने देखील एक फोटो शेअर करत अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.