छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. सध्या करोनामुळे मालिकेच्या चित्रकरणासाठी अनेक गोष्टींचे पालन केले जात आहे. तर मालिकेत भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकरने परवा त्याची तब्येत ठीक नसून त्याला सर्दी आणि ताप असल्याचे सांगत मालिकेच्या सेटवर येणार नसल्याचे सांगितले होते. सेटवर उपस्थित असणाऱ्या इतर लोकांची काळजी म्हणून मंदारने काही दिवस चित्रकरण न करण्याचा निर्णय घेतला.
मंदारची तब्येत ठीक नसल्याचं कळताच मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत गेल्या काही दिवसांपासून सेटवर तेव्हाच येतो जेव्हा त्याचा सीन असतो आणि त्यानंतर लगेच निघून जातो. तर, राज दोन-तीन दिवसांपासून सेटवर येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर कदाचित त्याला व्हायरल ताप आला असेल असे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
मंदारला या वर्षी मार्च महिन्यात करोना झाला होता. मात्र, मंदारची तब्येत आता ठीक असून त्याने काल दुपारी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना मंदार म्हणाला, ‘होय, मला ठीक वाटतं नव्हतं. खरं कर काल माझे जेवढे सीन होते त्याचे चित्रीकरण करता आले नाही. हे सगळे सीन गणपतीते होते.’