अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र अभिनयासोबतच मंदिरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. मंदिरा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत ती अनेकदा चाहत्यांचं लश्र वेधून घेत असते. तर अनेकदा ती तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर मंदिरा बेदीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोची नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगलीय. या फोटोत मंदिरा बेदी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.
मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात ती रुग्णालयातील कपड्यांमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून येतेय. खरं तर मंदिराचा हा फोटो आताचा नसून जुना आहे. हा फोटो शेअर करत मंदिराने तिच्या पहिल्या गरोदरपणातील आठवणींना उजाळा दिलाय. या फोटोत मंदिराच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद झळकताना दिसतोय. फोटो शेअर करत मंदिरा बेदीने हटके कॅप्शन दिलंय. “थ्रोबॅक टू माय बेस्ट प्रोडक्शन! त्यावेळी जेव्हा रुग्णालयात असणं म्हणजे आनंदाची गोष्ट असायची.” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.
View this post on Instagram
२०११ सालामध्ये मंदिरा बेदीने मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचं नाव वीर आहे. त्यावेळीचा फोटो मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. मात्र मंदिराचा हा फोटो पाहून सुरुवातील अनेक चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मंदिरा पुन्हा आई होणार अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या. मंदिराच्या अनेक चाहत्यांनी तसचं सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोला पसंती दिलीय. तर मंदिराची जवळची मैत्रीण अभिनेत्री मौनी रॉयने देखील मंदिराच्या फोटोवर कमेंट केली आहे.