बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंदिराचे पती आणि बॉलिवूड फिल्ममेकर राज कौशल यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 30 जून रोजी पहाटे ४.३० वाजता राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील अनेकांनी राज कौशल यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय.

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराने तिचा इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. या जागी मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम डीपीला ब्लॅक मार्क केलंय. त्यामुळे तिच्या फोटोच्या जागी आता तिथे काळ्या रंगाशिवाय काहीच दिसत नाही. मंदिराने काहीच न बोलता अशा प्रकारे पतीच्या निधनाचा शोक व्यक्त केलाय. मंदिराने इन्स्टाग्रामच्या डीपीला ब्लॅक मार्क केल्याने तीने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. पतीच्या निधनाच्या एक दिवस आधीच मंदिराने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. तर यापूर्वी तिच्या डीपीला देखील मंदिराचा बोल्ड फोटो होता.

mandira-bedi-insta-page
(Photo-Instagram@mandirabedi)

हे देखील वाचा: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिर खानची झाली होती ‘अशी ‘अवस्था; तेव्हा सलमानने दिला आधार

दरम्यान पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली होती. अनेक वर्षाच्या परंपरा मोडत मंदिरा बेदी पतीच्या अंतिम संस्काराच्या विधी पार पाडल्या. यावरून सोशल मीडियावर अनेक युजर्सने तिचं कौतुक केलं, तर काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यात मंदिरा बेदीची बाजू घेत अभिनेत्री सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर चांगलीच भडकली होती. तसंच मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सोना मोहपात्राने जबरदस्त उत्तर सुद्धा दिलं. याशिवाय मंदिराने पतीच्या अंत्यविधीसाठी जिन्स परिधान केल्याने देखील नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. या नेटकऱ्यांचा देखील सोना मोहपात्राने समाचार घेतला.