अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. फिल्म मेकर आणि प्रोड्युसर असलेल्या राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. राज कौशल यांच्या या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राज कौशल यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान राज कौशल यांना हार्ट अटॅक येणार यांची आधीच कल्पना आली असून त्यांनी याबद्दल मंदिराला सांगितलं होतं. राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्युझिक डाररेक्टर सुलेमान यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केलाय. ते म्हणाले, “29 जूनच्या संध्याकाळीच राजला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांनी पित्ताची काही औषधं घेतली आणि ते झोपी गेले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांनी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं सांगितलं.” असं सुलेमान म्हणाले.

आणखी वाचा: अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by BollyMetro (@bollymetro)

हे देखील वाचा: दीपिका पादूकोणने हेअर स्टायलिस्टची केली बत्ती गुल ; धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता

पुढे ते म्हणाले, “राजने मंदिराला हार्ट अटॅक येत असल्याचं सांगताच तिने त्यांचा मित्र आशिष चौधरीला लगेचच फोन केला. आशिष मंदिराच्या घरी पोहचला. मंदिरा आणि आशिषने तातडीने राजला गाडीत बसवलं आणि ते रुग्णालयात निघाले. लिलावती रुग्णालयात कदाचित ते जात होते. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं.. पुढच्या ५-१० मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबल्याचं मंदिराच्या लक्षात आलं. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राजला मृत घोषित केलं.” असं सुलेमान यांनी सांगितलं.

राज कौशल यांना या आधी ते अवघ्या ३०-३२ वर्षांचे असताना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. तेव्हा पासूनच ते तब्येतीची काळजी घेत होते. असं सुलेमान यांनी या मुलाखतीत सांगितलं. “मी माझा २५ वर्ष जुना मित्र गमावला आहे.” असं म्हणत यावेळी सुलेमान भावूक झाले.

1999 मध्ये मंदिरा आणि राज यांनी बांधली होती लग्नगाठ

कित्येक वर्षांच्या डेटिंग नंतर अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मंदिराने गेल्याच वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिच्या घरात येण्याने मंदिराचं कुटुंब परिपूर्ण झालं होतं. त्यावेळी संपुर्ण कुटुंबासोबत तिने एक फोटो क्लिक करून तो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

 

Story img Loader