अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मॅनहॅटनमधील घराजवळच हा हल्ला झाला. प्रियांकाने स्वत: तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. ‘माझ्या घरापासून थोड्या अंतरावर हा दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा मी काम उरकून घरी परतत होते,’ असं ट्विट तिने केलं आहे.
‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सिझनच्या शूटिंगसाठी प्रियांका सध्या अमेरिकेत आहे. ती शूटिंगवरून परतत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला. प्रियांकाने ट्विट करत या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
This happened 5 blocks from my home,As I drive back home from work,Dreary sirens remind me that this is the state of the world #nyc #peace
— PRIYANKA (@priyankachopra) November 1, 2017
Nyc.. As resilient as ever. Iu. My condolences to everyone affected by this tragedy.
— PRIYANKA (@priyankachopra) November 1, 2017
‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ स्मारकाजवळ सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर हा हल्ला झाला. दहशतवाद्याने या मार्गावर ट्रक चालवत अनेकांना चिरडले. यानंतर त्याने ट्रकबाहेर उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतले.