24 मार्च 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली.या घोषणेनंतर देशभरातील सर्वच नागरिकांची झोप उडाली. संभ्रम, चिंता, भीती अशा अनेक भावनांचा प्रत्येक जण सामना करता होता.
करोना, लॉकडाउन या सर्वाचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला. मालिकांचं चित्रीकरण थांबवावं लागलं. घरापासून दूर असलेलेल, तासंनतास सेटवर शूटिंगसाठी थांबणारे कलाकार घरांमध्ये कैद झाले. लॉकडाउनचा पहिला टप्पा हा तर प्रत्येकासाठीच चिंताजनक होता.

मालिकांमधून घराघरात पोहचलेला सर्वांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर याने त्याचा लॉकडाउनचा काळ कसा होता हे लोकसत्तासोबत शेअर केलं आहे. सगळ्यांप्रमाणे सुरुवातीला त्याचाही गोंधळ उडाल्याचं त्यानं सांगितलं आहे.

अनेक कलाकारांना शूटिंगसाठी घरापासून दूर राहवं लागतं शिवाय तासंतास शूटिंगमध्येच व्यस्त असल्यानं कुटुंबियांना वेळ देणं तसं कठिणचं असतं. मात्र लॉकडाउनमुळे या कलाकारांच्या कुटुंबियांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळाला.

लॉकडाउन म्हणजे निसर्गाने घेतलेला एक ब्रेक असल्याचं तो म्हणतोय. “लॉकडाउनमुळे सुरुवातीला गोंधळ उडाला. मात्र नंतर जसा काळ लोटत गेला. तसा कुटुंबासोबत आपण वेळ घालवत असल्याचा आनंद झाला.” असं तो म्हणतोय. या लॉकडाउनमुळे बरचं काही गमवावं लागलं असलं तरी बरचं काही कमावलं असं तो म्हणतोय. लॉकडाउनच्या परिस्थितीने बरचं काही शकवल्याचं ही तो म्हणाला आहे.

पहा फोटो- मराठी सेलिब्रिटी लॉकडाउनच्या काळात काय करत होते?

एकंदरच या संपूर्ण वर्षात मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र त्यातही अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून चाहत्यांचं मनोरंजन करण्य़ाचा प्रयत्न केला. त्याच सोबत लॉकडाउनमुळे त्यांना इतर गोष्टींसाठी वेळ देणं शक्य झालं.