मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. शशांकच्या पत्नीने प्रियांकाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे. ही गुड न्यूज शशांकने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सोबतच त्याने त्याच्या मुलाचं नावदेखील सांगितलं आहे.

शशांकने त्याच्या बाळासोबत एक छान फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने बाळाचं नाव ऋग्वेद ठेवल्याचं जाहीर केलं आहे.  शशांकची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

डिसेंबरमध्ये शशांकने एक पोस्ट शेअर करत  तो लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. शशांक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून तो विशेष लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता तो लवकरच ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिकेत झळकणार आहे.