Vijay Chavan Passes away : ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं याच्या ६३ वर्षी  निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. मात्र बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

विजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते. मोरुची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते. त्यांच्या चित्रपट, नाटकांतील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

saleel kulkarni special post for his son shubhankar
सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट
Sangli, Vasant Keshav Patil,
सांगली : साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन
manish paul drives cm eknath shinde car spotted at mumbai airport
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीत बसताच ‘हा’ बॉलीवूड अभिनेता झाला सारथी; व्हिडीओ व्हायरल
Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.