रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या ‘तेजाज्ञा’ या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने मेहुल पै याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यामध्येच आता तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील काही क्षण कैद करण्यात आले आहेत. यात लग्नापूर्वीची लगबग, ऐन लग्नातील धावपळ आणि लग्न लागतानाचे काही क्षण असं सारं काही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
पाहा : वधू लाजरी झालीस तू गं; अभिज्ञाच्या लग्नाचा खास अल्बम
दरम्यान, अभिज्ञा- मेहुलच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती अभिज्ञा-मेहुलने लग्नगाठ बांधली. मेहुल मुंबईत स्थायिक असून ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.