आपल्या सौंदर्यांने आणि अप्रतिम अभिनयाने अनेक मराठी अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. अनेकांना घायाळ करणाऱ्या याच अभिनेत्री लहानपणी कशा दिसतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकताच मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने तिच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मृणाल अतिशय क्यूट आणि गोड दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मृणाल अनेक वेळा तिच्या आगामी मालिका आणि चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. मृणालने आता पर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. तिने ‘तू तिथे मी’,’अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम केले आहे. पडद्यावर सोज्जवळ दिसणारी मृणाल खऱ्याखुऱ्या आयुष्यातही अशीच आहे का? असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. खरतर एक साधीभोळी, सरळ आणि सोज्जवळ अभिनेत्री म्हणून मृणाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखली जाते.
View this post on Instagram
Happy birthday to the King of my Heart and Love of my Life …!! Love u Pappa….
आणखी वाचा : ‘झपाटलेला’ चित्रपटातील लक्ष्याची ऑनस्क्रीन प्रेयसी आता कशी दिसते?
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आणखी वाचा : अरेच्चा! राधिकाचा नवरा झाला शनायाचा भाऊ
सध्या मृणाल ‘मन बावरे’ या मालिकमध्ये काम करत आहे. या मालिकेत मृणालसह अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेतील मृणाल आणि शशांकची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते.