सध्या अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा तिने फेसबुकवर लिहिलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आता केतकीने आणखी एक पोस्ट करत शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचे म्हटले आहे.

केतकीने या पोस्टमध्ये ‘शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Liquor license also in the name of Mahayuti candidate Sandipan Bhumre wife
भुमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

या स्क्रिनशॉटमध्ये ‘महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता तुम्ही आणि हसता… महाराष्ट्रामध्ये राहून त्यांच्या जीवावर नाव कमावले आणि आज त्यांचा एकेरी उल्लेख करता… मी शिवसेना विभाग प्रमुख आहे. पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना.. मग बघ,’ असे म्हटले आहे.

काय होती केतकी चितळेची पोस्ट?

‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ असे तिने म्हटले होते.

‘सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका’, असे तिने पुढे म्हटले आहे.

केतकीला या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. तसेच दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.